घायाळ करणारी सखी...

नमस्कार ,
कसे आहात सर्व?
आजचा विषय काहीतरी वेगळा आहे.

सखी (मैत्रीण)- घायाळ करणारी सखी 

माझ्या ह्या कवितेमध्ये मी काही ओळी लिहिल्या आहेत.
संपूर्ण असे वर्णन नाही पण थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केलाय.



सावळा तुझा रंग सखे
नाकी डोळी छान
प्रेमळ अशी अदा तुझी
करते मला घायाळ

केसात तुझ्या गजरा सखे
चाल अशी कमाल
पैजनांचा आवाज तुझ्या
जणू संगीताचे ताल

मोहक तुझे डोळे सखे
काजळ तुझे छान
नजर रोखुनी पाहतेस मजला
का करते घायाळ?


- मयुर पाटील (DoRaEmOnFan)



Pic Credit- drawinglics . com
Really awesome sketch & sorry for removing watermark (ur signature) which is present on ur sketch.

आवडली असेल तर नक्की प्रतिक्रिया द्या. तुमची एक छोटीशी कमेंट मला अजून काहीतरी नवं लिहायची चालना देते 😊✌️

Comments

Popular posts from this blog

हर एक सपना सच होगा तेरा... ✌️

☺️माझं पहिलं ब्लॉग😊