कळी 🌷

नमस्कार,

माझी एक मराठी भाषेमध्ये लिहिलेली कविता येथे शेअर करत आहे.
आशा करतो तुम्हाला ती आवडेल.😊


एक छोटीशी कळी तिच्या मनातील भावना व्यक्त करत आहे..




छोटीशीच तर कळी मी
तोडू नका ना मला
वेदना तर खूप होतात
पण कसं समजवाय‌‍चं तुम्हाला.

जरा फुलू द्या रे मला
इतक्यात तरी वाहू नका
इच्छा मनी एकच माझी
एक सुंदरसे फुल ह्वायचयं मला

धाग्यात गुंफुनी मग
स्पर्श करायचंय मला
केसांत माळूनी तिच्या
संपूर्ण आसमंतात दरवळायचंय मला.


- मयुर पाटील (DoRaEmOnFaN)

Comments

Popular posts from this blog

हर एक सपना सच होगा तेरा... ✌️

☺️माझं पहिलं ब्लॉग😊

घायाळ करणारी सखी...